
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख खून प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मंगळवारी पोलिसांना शरण आला. मात्र शरण येतेवेळी त्याने जी स्कॉर्पिओ गाडी वापरली तीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात होती, असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. अजित पवार यांनी मस्साजोगला पीडित कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्या ताफ्यात हीच गाडी होती असं सोनवणे म्हणाले.