

sushil walmik karad
esakal
Dhananjay Munde: स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराड याने शुक्रवारी दुपारी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुशील कराड हा काहीतरी गौप्यस्फोट करणार असल्याचं दिसतंय. याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी एक भाकीत केलं होतं. कराडचं कुटुंब धनंजय मुंडेंविरोधात पत्रकार परिषद घेणार, असं ते म्हणाले होते. तोच हा संदर्भ आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.