वंचितमध्ये उभी फूट; एमआयएम पडणार बाहेर?

वंचितमध्ये उभी फूट; एमआयएम पडणार बाहेर?

मुंबई : वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी असा एमआयएमचा प्रस्ताव असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्ताव देऊनही निर्णय होत नसल्यानं एमआयएमचे नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. स्वतंत्र लढण्यासाठी एमआयएम पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना महाराष्ट्रातून पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहले असल्याचे सांगण्यात येत आहे.

जागांबाबत एकमत होत नसल्यानं एमआयएम नेत्यांचा स्वबळावर लढण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, एमआयएम पक्षाने आघाडीच्या चिन्हावर विधानसभा निवडणुक न लढता आपल्या पतंग चिन्हावरच निवडणुक लढण्याचा आग्रह धरला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाने आणि हैद्राबादच्या ओवेसी बंधूनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करत सर्वांनाच धक्का दिला होता. लोकसभा निवडणुकीत मोठी मतेही मिळवण्यात ही आघाडी यशस्वी झाली. परंतु, आता वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. आज (ता.19) प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत पत्रकार परिषद असून प्रकाश आंबेडकर या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com