वंचितची स्वबळाचीच तयारी; पहिली यादी 'या' तारखेला होणार जाहीर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला मिळालेल्या यशाच्या जोरावर विधानसभा निवडणुकीतही वंचितने स्वबळाची तयारी केली आहे. येत्या जुलैला उमेदवारांची पहिली यादी ते जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला मिळालेल्या यशाच्या जोरावर विधानसभा निवडणुकीतही वंचितने स्वबळाची तयारी केली आहे. येत्या जुलैला उमेदवारांची पहिली यादी ते जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात जास्त मते प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर प्रामुख्याने काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छूकांचा डोळा आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूकांकडून त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांना पुढे केले जात आहे. तर काही मात्तबर वंचितमुळे मतविभाजन होऊ नये यासाठी स्वताचा कार्यकर्ताच डमी उमेदवार म्हणून देण्याची रणनीती आखण्यात येत आहे.

नुकत्याच झालेला लोकसभा निवडणुकीत 52 विधानसभा मतदारसंघात प्रभावी मते घेतली आहेत. तर 66 विधानसभा मतदारसंघात किमान 20 हजारहून जास्त मते घेतली आहेत. अशा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसणार आहे.

वंचित आघाडी  स्वबळाची तयारी करीत असून महाआघाडीत सामील होण्याची शक्यात धूसर आहे. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे. विदर्भातील उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूकीची पुर्वतयारी म्हणून इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. 

पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनॅलिसेस ब्युरो (PRAB)म्हणण्यानुसार, 13 ते 16 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व मतदारसंघासाठी वंचितकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर मराठवाड्यातील मतदारसंघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर मुलाखती वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटर्री बोर्ड सदस्य अॅड अण्णाराव पाटील, अशोकभाऊ सोनोने आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतल्या जाणार आहे.

मराठवाड्याकरीता मुलाखतींचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -  उस्मानाबाद - 21 जुलै 2019, बीड - 22 जुलै 2019, लातूर - 23 जुलै 2019, नांदेड - 24 जुलै 2019, हिंगोली - 25 जुलै 2019, परभणी - 26 जुलै 2019, औरंगाबाद - 27 जुलै 2019, जालना - दि. 28 जुलै 2019 वरील तारखेला प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी सकाळी 10.00 वाजता पासून मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीत इच्छुकांना मतदारसंघातील सामाजिकदृष्ट्या जातीय समीकरण विचारले जाते तर राजकीयदृष्ट्या यश कसे मिळू शकते याचा अंदाज व शक्यतेबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wanchit Bahujan Aghadi first list will be announced on the 30th july