Jainism : जैन धर्मियांमध्ये तुफान राडा! श्वेतांबर अन् दिगंबर एकमेकांना भिडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

washim news

Jainism : जैन धर्मियांमध्ये तुफान राडा! श्वेतांबर अन् दिगंबर एकमेकांना भिडले

वाशिमः वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर येथे दिगंबर आणि श्वेतांबर जैन यांच्यामध्ये तुफान राडा झाला. श्वेतांबर पंथियांची रॅली सुरु असतांना दिगंबर पंथियांनी घोषणा दिल्या. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांना चांगलेच भिडले.

वाशिमच्या शिरपूर येथे जैन धर्मियांच्या पार्श्वनाथाचं मंदिर आहे. श्वेतांबर पंथियांनी आज पार्श्वनाथाच्या दर्शनासाठी रॅली काढली होती. ही रॅली दिगंबर जैन पंथियांच्या कार्यालयासमोरुन जात असतांना दिगंबरांनी घोषणाबाजी सुरु केली.

हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

दोन्ही गटामध्ये अचानक राडा सुरु झाला. घोषणाबाजी, हाणामारी अन् चपलाफेकही झाली. या घटनेमुळे गावकरी चांगलेच संतापले होते. दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने हाणामारीला सुरुवात झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झालं होतं. काही वेळातच पुन्हा वाद पेटला.

श्वेतांबर आणि दिगंबर जैन यांच्यामध्ये अशा प्रकारे राडा झाल्याने शिरपूरकर आक्रमक झाले होते. स्थानिकांनी घटनेचा निषेध करुन या लोकांनी एकमेकांवर विटा आणि खुर्च्या फेकल्याचं उपस्थित महिला ग्रामस्थांनी सांगितलं. जैन धर्मियांमध्ये वाद पेटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

टॅग्स :RelationsWashim