नाशिक- वाढत्या शहरीकरणासोबत पाण्याची मागणीदेखील वाढते आहे. यातून भारताला २०३० मध्ये असलेल्या पाण्याच्या गरजेच्या तुलनेत केवळ निम्मेच पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन, संवर्धन करताना ‘वॉटर फूटप्रिंट’ कमी करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे, अन्यथा पुढील पाच वर्षांमध्ये पाण्यासाठी हाणामारीसह अन्य गंभीर गुन्हे घडण्याचा संभाव्य धोका नाकारता येत नाही, असेही निरीक्षण नोंदविले आहे