Eknath Shinde : 'बोम्मई यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन कोणी ट्विट केली याची माहिती मिळाली' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde : 'बोम्मई यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन कोणी ट्विट केली याची माहिती मिळाली'

नागपुरात आज हिवाळी आधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरताना दिसून येत आहे. अजित पवार यांनी अधिवेशनाच्या सुरवातीला महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर भाष्य केलं आहे. यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सीमावाद निवारणासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. सीमेवर राहणाऱ्या लोकांसाठी सुरू असणाऱ्या काही योजना आधीच्या सरकारने बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरू केल्या. टीसाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावादामध्ये हस्तक्षेप केला आहे. या सीमावादावर राजकारण झालं नाही पाहिजे. आपण सर्वानी मिळून सीमेवरील लोकांसाठी उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला खूप विषय आहेत. बाकी विषयावर राजकारण करा.

हेही वाचा: कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू; महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा होणार का?

सीमावाद प्रश्नावर जेव्हा ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा त्यांना सांगितलं की, तुम्ही जे ट्विट करत आहात ते चुकीच आहे. त्यावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. ते ट्विट आमचं नाही. ते ट्विट ज्यांनी केलं आहे. त्याची माहितीही कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना मिळाली आहे. याची माहिती या सभागृहात मिळेल. या ट्विटच्या मागे कोणते पक्ष आहेत याची माहिती लवकरच मिळेल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा: Karnataka Border Dispute : 'मविआ' नेते बेळगाव सीमेवर दाखल; आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातल्या काही गावांवर दावा केल्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये राजकारण तापलं होतं. आता जेव्हा हे प्रकरण भाजपच्या अंगाशी येत असल्याचं दिसून आलं, तेव्हा मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरुय. 'तो मी नव्हेच' अशी लखोबा लोखंडेची भूमिका बोम्मई यांनी घेतली होती. तर ट्विट करणारे अकाऊंट माझे नाही. मी ते ट्विट केले नाही अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी दिली होती.

हेही वाचा: Devendra Fadnavis on Maharashtra Karnatak Border Issue : सीमावादावर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली