क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास लवकरच पुर्ण करू - NCB | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCB

क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास लवकरच पुर्ण करू - NCB

sakal_logo
By
सुधीर काकडे

एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तपासाबद्दल माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आर्यन खानचा जबाब नोंदवला असल्याचे सांगितले. तसेच आता पर्यंत १४-१५ लोकांचे जबाब नोंदवले असून, प्रभाकर साईलला देखील चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं. किरण गोसावी बद्दल बोलताना ते म्हणाले की, गोसावी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेऊ.

हेही वाचा: मुस्लीम समाजाच्या मोर्चाला अमरावती, मालेगावमध्ये हिंसक वळण

एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी यावेळी, चौकशीदरम्यान काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले असल्याचे सांगितले. आम्ही सर्व फुटेज पाहिले. तसेच प्रभाकर साईलची चौकशी अद्याप सुरु आहे. आतापर्यत 14 ते 15 जणांचा जवाब नोंदवण्यात आला आहे. एनसीबीचा तपास अद्याप सुरु आहे. त्याविषयी झालेल्या तपासाची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. तर तपासाचा भाग असलेल्या काही गोष्टींवर बोलण्यास नकार दिला आहे.

loading image
go to top