

पुणे : दक्षिण पूर्व मध्य प्रदेशपासून तेलंगणाच्या मध्य भागापर्यंत विदर्भमार्गे जाणारी एक द्रोणिका रेषा सक्रिय आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत पुढील काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील कोकण-गोवा भागात सोमवार (ता. १४) आणि मंगळवारी (ता. १५), तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.