IMD Yellow Alert in Maharashtra
esakal
पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी तडाखा देत आहेत. आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने (IMD Yellow Alert in Maharashtra) दिला आहे.