

पुणे : राज्यात थंडी कमी झाली असतानाच, उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी पारा ३६ अंशांवर पोचला असून, विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३७.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. उद्या (ता. ५) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात काहीशी घट होण्याचा, तसेच उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.