Weather Update: देशभरासह राज्यात जोरदार पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे
Weather Update
Weather UpdateEsakal
Updated on

देशासह अनेक राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर दक्षिण भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.(Latest Marathi News)

तर हवामान विभागाच्या माहितीनुसार, गोवा आणि महाराष्ट्र राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरातमध्ये 7 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

Weather Update
Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला; खरिपाच्या पेरणीत व्यत्यय

तर काही राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरीत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Latest Marathi News)

Weather Update
Weather Update: राज्याच्या पावसाची हजेरी; कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

तर भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 3,4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. तर आज राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Update
Rain Update : पुणे, मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी; 2 जिल्ह्यांत हवामान विभागाकडून अलर्ट

रायगड आणि रत्नागिरीमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, पुणे आणि ठाण्यासह दहा जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात बहुतेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 3,4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Weather Update
Mumbai Rain Update : आजही पाऊस झोडपणार! मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.