Heavy Rainfall :राज्यात मुंबई, ठाण्यासह पुण्यात 2 डिसेंबरपर्यंत पावसाचा इशारा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

Rain : राज्यात मुंबई, ठाण्यासह पुण्यात 2 डिसेंबरपर्यंत पावसाचा इशारा!

राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाचा तडाखा पुन्हा सुरु होणार आहे. पुन्हा एकदा कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा मुंबई ठाणे, पुणेसह (Konkan, Central Maharashtra, Marathwada Mumbai Thane, Pune)काही ठिकाणी मेघगर्जनेसह ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा इशारा देण्य़ात आला आहे.

दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, ठाणे,अहमदनगर, धुळे, पालघर, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. याबरोबरच कोकणात ढगाळ हवामान, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह गडगडाटी वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शनिवारी (ता.२८) हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता. आज परत २ डिसेंबर पर्यत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २९ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. तर ३० डिसेंबर रोजीही काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. २ डिसेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ऊस तोडणी सुरु आहे. तर कोकणात आंब्याला मोहर यायला सुरु झाला आहे. आता पाऊस परत झाला तर ऊस तोडणीवर याचा परीणाम होऊ शकतो. सांगली जिल्ह्यात द्राक्ष मणीला फटका बसण्याची शक्यता आहे. तडा जाण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी पडणारे दव द्राक्ष टिकवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कसोटीचा काळ आहे. राज्यभरात पुन्हा तीन दिवस ढगाळी वातावरण आणि पावसाचे राहतील, असा हवामान विभाग तसेच तज्ज्ञानी अंदाज वर्तवला आहे. चार दिवस पूर्व सुचना मिळाल्याने आतापासूनच नियोजन सुरु केले आहे. निसर्गाच्या लहरीपणीशी द्राक्ष उत्पादकांचा संघर्ष सुरुच आहे.

हेही वाचा: राज्यात पुन्हा 2 दिवस पावसाचा इशारा ; 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

गेली महिनाभर पावसामुळे द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. कधी अवकाळी तर कधी वादळी पावसाने यंदा द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. पुन्हा पावसाच्या शक्यतेने शेतकरी हबकले आहेत. गेली महिनाभर फुलोऱ्यातील बागा वाचवण्यासाठी बागायतदारांची धांदलीचे रोजचेच चित्र विदारक आहे. प्रयत्न करुनही बागा वाचतील, अशी खात्री नाही. तरीही महागड्या फवारण्यांचा जुगार सुरु आहे. गेली दोन वर्षे अतिवृष्टी, कोरोनने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. महिनाभर मॉन्सुनच्या पावसातून बागा वाचवला. मात्र, वादळी पावसाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे.

सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १.२५ लाख एकर आहे. सर्व वादळात फुलोऱ्यात सापडलेल्या बागांचे क्षेत्र किमान ४५ ते ५० हजारावर जाते. त्यांच्या थेट उत्पादनात घट होणार आहे. जिल्ह्यातील ढगाळी वातावरण, पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. विशेषतः शाळू ज्वारीला फायदा होत आहे. रब्बीतील हरभरा आणि अन्य पिकांनाही पाऊस उपयुक्त आहे.