Rain Update: राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार; आज 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Update: राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार; आज 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Rain Update: राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार; आज 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

गेल्या काही दिवसात पावसाने काही दडी मारली आहे. राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाकडून काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता इतर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू असून पुढच्या काही दिवसांत पावसाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे आता हवामानातही बदल दिसून येत आहे.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढचे चार दिवस मान्सून सक्रीय राहणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा यासह अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारपासून परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून परतीचा प्रवास करणार आहे.