esakal | कोकणकर काळजी घ्या! पुढील 24 तासांत मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

Chance of heavy rain Kokan for three days

कोकणसह या काही भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोकणकर काळजी घ्या! पुढील 24 तासांत मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस

sakal_logo
By
स्नेहल कदम

रत्नागिरी - काही दिवसांपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. हा पावसाचा जोर काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वेगाच्या वाऱ्यासह आहे. दरम्यान आज राज्यात येत्या २४ तासात कोकणासह, मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. हीच परिस्थिती शनिवारी विदर्भातील काही भागात असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे कोकणसह या काही भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यामुळ राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरील नागरिक आणि मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. मान्सुनच्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. वातावरणातील आर्द्रता हळुहळू कमी झाली की, त्यानंतर हा प्रवास पुढच्या टप्प्यातून संपण्यासाठी वेळ लागत नाही. काही दिवसांपासून सुरु झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह पावसाने झोडपून काढले. हातातोंडाशी आलेले पीकाचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

हेही वाचा: निवडणूक शपथपत्र : फडणवीस यांच्याविरोधात साक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू

यंदा सप्टेंबरमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अखेरच्या आठवड्यातील चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास लांबला आहे. हा प्रवास वायव्य भारतामधून ६ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. सर्वसाधारणपणे हा प्रवास १७ सप्टेंबरला सुरू होतो. परतीच्या पावसाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रेंगाळलेला प्रवास आहे.

loading image
go to top