
मुंबई- देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी राज्यात 50 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. परिस्थिती गंभीर बनत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू केला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली होती. बैठकीदरम्यान विरोधी पक्षांशी चर्चा करण्यात आली. विरोधकांनी सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय. त्यानंतर राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात शुक्रवारी सायंकाळी 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. इतर दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 8 दरम्यान जमावबंदी असेल आणि सायंकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंच संचारबंदी असणार आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
राज्या सरकारकडून नवी नियमावली जाहीर
-शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असेल
-सर्व प्रकारची वाहतूक सुरु असेल, गर्दीची ठिकाणं बंद
-हॉटेल्स, रेस्तराँ, सिनेमागृहे, थिएटर, मॉल 30 एप्रिलपर्यंत बंद असतील, पार्सल सेवा सुरु राहील
-उद्योग सुरु राहतीस पण वेळेचे बंधन पाळावे लागेल. कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक
चित्रपट, मालिकांच्या शुटिंगला परवानगी, पण गर्दीच्या ठिकाणी शुटींग नाही
-कन्स्ट्रक्शन साईट सुरु राहतील, पण, मालकाला कर्मचाऱ्याची काळजी घ्यावी लागणार, आजारी पडल्यास कामावरुन काढून टाकता येणार नाही
-खासगी कार्यालयांना वर्क फॉर्म होम अनिवार्य
-सलून, ब्यूटी पार्लर, जीम बंद असतील.
-मैदाने, उद्याने पूर्णपणे बंद राहणार
-धार्मिक स्थळांमध्ये फक्त धर्मगुरुंना परवानगी
-भाजी मंडई सुरु राहील, पण गर्दी टाळावी लागेल
-सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु, उद्योग क्षेत्रावर वेळेचं बंधन
- जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहतील
- शेतीमालाची वाहतूक सुरु राहील
- योग्य कारण नसल्यास बाहेर फिरण्यास बंदी
- सार्वजनिक ठिकाणी रात्री साठ ते सकाळी 7 पर्यंत फिरण्यास पूर्ण बंदी
-किराणा दुकाणे, औषध, भाजीपाला सुरु राहतील
-ग्राहकांनी नियमांचे पालन करावे यासाठी दुकान मालक जबाबदार
- रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवाशी, मोठ्या गाड्यांमध्ये 50 टक्के क्षमतेने वाहतूक, उभे राहून प्रवास करण्यात मनाई
-दुकानदार, व्यावसायिक, गाडी चालक-वाहक यांनी लवकरात लवकर लस घेणे आवश्यक
- रेल्वेंमध्ये उभ्याने प्रवास करण्यास मनाई
-बँका, स्टॉक मार्केट, विमा, दूरसंचार, वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा करणारी कार्यालये सुरु राहतील
- जे अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत, अशा सरकारी कार्यलयांमध्ये 50 टक्के क्षमतेची अट
- रस्त्याच्या बाजूला उभारुन खाद्य विक्री करणाऱ्यांनी सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत पार्सल सेवा देऊ शकतील
- होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक, नसल्यास अशा व्यक्तीला हजार रुपये दंड, संबंधित संस्थेला 10 हजार दंड
- वृत्तपत्र छपाई, वितरण सुरु राहील
-शाळा, कॉलेज बंद राहतील, खासजी क्लासेस बंद राहतील पण 10 आणि 12 वीच्या परीक्षांचा अपवाद असेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.