Vasant Kanetkar: प्रसिध्द नाटककार वसंत कानेटकरांची आज पुण्यतिथी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasant Kanetkar

Vasant Kanetkar: प्रसिध्द नाटककार वसंत कानेटकरांची आज पुण्यतिथी...

Vasant Kanetkar: वसंत कानेटकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर ह्या गावी २० मार्च १९२० रोजी `रविकिरण मंडळा'तील एक कवी गिरीश (शं. के. कानेटकर) ह्यांच्या पोटी झाला. एम्‌. ए. झाल्यानंतर १९४६ पासून नाशिकच्या `हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालया`त ते मराठीचे प्राध्यापक होते.

Vasant Kanetkar

Vasant Kanetkar

कानेटकरांच्या घर (१९५१), पंख (१९५३) आणि पोरका (१९५६) या कादंबऱ्या खूप प्रसिध्द आहेत. आज नाटककार म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी आहे. वेड्याचं घर उन्हांत (१९५७) हे त्यांचे पहिले नाटक त्यानंतर त्यांनी एकुण   १४ नाटके लिहिली. 

Vasant Kanetkar

Vasant Kanetkar

प्रेमा, तुझा रंग कसा? (१९६१), रायगडाला जेव्हा जाग येते (१९६१), मत्स्यगंधा (१९६४), अश्रूंची झाली फुले (१९६६), लेकुरे उदंड जाली (१९६६), मला काही सांगायचय! (१९७०) आणि हिमालयाची सावली (१९७२) ही विशेष उल्लेखनीय नाटके होत. व्यासांचा कायाकल्प (१९६७)आणि मद्राशीने केला मराठी भ्रतार (१९६९) हे त्यांचे एकांकिका संग्रह.

Vasant Kanetkar

Vasant Kanetkar

वेड्याचं घर उन्हात या नाटकास `महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवा'त लेखनाचे पारितोषिक मिळाले (१९५८). रायगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकास `संगीत नाट्य अकादमी' चे पारितोषिक मिळाले (१९६४).

Vasant Kanetkar

Vasant Kanetkar

मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे पुनरूज्जीवन करून कानेटकरांनी त्यांंना नवे स्वरूप दिले. कानेटकरांची नाटकं मेलोड्रॅमॅटिक असली तरी संवादसौंदर्यामुळे अनेकांची मने जिंकू शकतात. कानेटकरांचा मृत्यू ३१ जानेवारी २००१ साली वयाच्या ७९ वर्षी नाशिक येथेच झाला.