Western Railway : दहा महिन्यांत पश्चिम रेल्वेने १ कोटी ५३ लाखांचा चोरीचा माल केला जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Western Railway

पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने विविध गुन्ह्यातील ५५० गुन्हेगारांना अटक केली.

Western Railway : दहा महिन्यांत पश्चिम रेल्वेने १ कोटी ५३ लाखांचा चोरीचा माल केला जप्त

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने विविध गुन्ह्यातील ५५० गुन्हेगारांना अटक केली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात ही कारवाई करुन त्यांच्याकडून एक कोटी ५३ लाखांचा चोरीला माल जप्त केला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरुन दररोज २५ ते २७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी इनबिल्ट रिकिशन सिस्टम (एफआरएस) सोबत ४८८ कॅमेरांसह तीन हजार ८९७ सीसीटीव्ही लावले आहेत. रेल्वे स्थानक, परिसर आणि प्लटफार्मवर विविध गुन्हे घडतात. त्या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि शोध घेण्याकरिता सीसीटीव्ही उपयोगी पडतात. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात विविध ५५० गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ५३ लाखांचा चोरीचा माल जप्त केला आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले की, दक्ष आरपीएफ जवानांनी प्रवाशांशी संबंधित चोरी आणि दरोडा यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांना पकडले आहे आणि प्रवाशांकडून मोबाईल फोन, रोकड असलेल्या बॅग, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे, पाकीट इत्यादी जप्त करण्यात मदत केली आहे. या समाजकंटकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांचा ताब्यात देण्यात आले आहे.