
नितीन बिनेकर
मुंबई : रेल्वे प्रवाशांची बदलती जीवनशैली आणि डिजिटल वर्कच्या गरजेचा विचार करून पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक अत्याधुनिक डिजिटल लाउंज साकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, बोरिवली, सुरत, बडोदा यासारख्या प्रमुख स्थानकांवर हे डिजिटल लाउंज उभारण्यात येईल. देशातील पहिले डिजिटल लाउंज मुंबईमध्ये स्थापन होणार. या लाउंजमध्ये प्रवाशांना चहा-कॉफीच्या आस्वादासोबतच एकांतात कार्यालयाचे काम करण्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.