esakal | मेगाभरतीत प्रवेश रखडेल्या 'या' नेत्यांचं पुढे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

मेगाभरतीत प्रवेश रखडेल्या 'या' नेत्यांचं पुढे काय?

- सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक नेत्यांचे काय?
- उर्विरित नेत्यांना प्रवेश कधी?

मेगाभरतीत प्रवेश रखडेल्या 'या' नेत्यांचं पुढे काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज (ता.01) काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज केवळ तीनच नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

आज (ता.01) भाजपमध्ये प्रवेश होणार करणाऱ्या नेत्यांमध्ये कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचा समावेश आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक नेत्यांचे काय?
विविध जिल्ह्यांतील हे तीन नेते सोलापूरमधील कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार असले तरीही खुद्द सोलापूरमधील नेत्यांचा भाजप प्रवेश मात्र लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. तसेच काँग्रेसचेही सोलापूरमधील काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र अजून राजकीय वाटाघाटी पूर्ण झाल्या नसल्याने या नेत्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. आता आज प्रवेश लांबणीवर गेल्याने त्यांचे पुढे काय होणार या चर्चांनाही सोशल मीडियावर उधाण आहे.

उर्विरित नेत्यांना प्रवेश कधी?
उर्वरित इच्छुक नेत्यांमध्ये साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सत्यजित देशमुख यांचा भाजप प्रवेश कधी होणार हे मात्र अनुत्तरितच आहे असे म्हणावे लागेल.

loading image
go to top