Raj Thackeray : टोलमुक्तीच्या घोषणेचे काय? मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाजपला प्रतिआव्हान

समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांच्याशी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा वाद झाला
what about to bjps promise of toll free maharashtra mns raj thackeray
what about to bjps promise of toll free maharashtra mns raj thackeraysakal

पुणे : ‘‘टोलनाका तोडफोड प्रकरणांवर बोलण्यापेक्षा ‘महाराष्ट्र टोलमुक्त करू’ या नऊ वर्षांपूर्वी दिलेल्या घोषणेचे काय झाले हे भाजपने आधी सांगावे,’’ असे प्रतिआव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिले.

समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांच्याशी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा वाद झाला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला. पुणे दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खडड्डयांमुळे सर्वत्र वाहतूक कोंडी होत आहे आणि सरकार मात्र टोल वसूल करत आहे. केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्रातील महामार्गच सर्वात खराब आहेत,‘ अशी टीका त्यांनी केली.

what about to bjps promise of toll free maharashtra mns raj thackeray
Amit Thackrey: टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसेच्या ८ कार्यकर्त्यांना अटक; अमित ठाकरेंच्या गाडीवरून...

‘‘अमित महाराष्ट्राचा दौरा करीत आहे. तो काही टोलनाके फोडत चाललेला नाही. त्याच्या गाडीला फास्टॅग आहे. त्यातून टोल कापला गेला होता. तरीही गाडी अडवली गेली. तेथील कर्मचाऱ्यांनी वॉकीटॉकीवर बोलताना उद्धट भाषा वापरली. त्यामुळे पुढील प्रकार घडला. अमित राजकारणात आल्यामुळेच त्याच्यावर आरोप केले जात आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी घडलेल्या प्रकाराचे समर्थनही केले.

रस्ता पूर्ण करण्याआधी टोल सुरू केला जातो. टोलवाले म्हैसकर कुणाचे लाडके आहेत? त्यांनाच प्रत्येक वेळी टोलवसुलीची कामे कशी मिळतात,‘‘ असा प्रश्‍न उपस्थित करून ते म्हणाले,‘‘ समृद्धी महामार्गाभोवती कुंपण नसल्याने जनावरे रस्त्यावर येतात.

what about to bjps promise of toll free maharashtra mns raj thackeray
Raj Thackeray on Toll Plaza: म्हैसकर कुणाच्या जवळचे? अमित ठाकरेंवरील भाजपच्या टीकेनंतर राज ठाकरेंचा संतप्त सवाल

कुंपण न घालता महामार्ग खुला करून टोलवसुली सुरू आहे.महामार्गावरील अपघातांत आतापर्यंत चारशे लोक मृत्युमुखी पडले. त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? ’’

कोणी कोणाला भेटले म्हणून युती होत नाही. त्यामुळे भाजपच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यात कोणता पक्ष विरोधात आहे हेच समजत नाही. त्यामुळे मनसे हाच एकमेव विरोधी पक्ष उरला आहे.

— राज ठाकरे, मनसेचे अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com