रिक्षा चालवणे हा स्वयंरोजगाराचा भाग आहे. राज्यातील महिलांना आर्थिक परिस्थिती मुळे रिक्षा खरेदी करता येत नाही.
Pink E-Rickshaw Scheme : महिला व मुलींना रोजगार मिळावा, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे, सक्षमीकरण व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी अर्थसंकल्पात महिला व बालविकास विभागाअंतर्गत ‘पिंक ई-रिक्षा’ योजना राज्य शासनाने सुरू केली. अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर १० जिल्ह्यांत ती सुरू आहे.