
"छावा" चित्रपटात दर्शवलेल्या घटनांनुसार, कान्होजी आणि गणोजी यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीत फसवून दिलं. यामुळे, मुगलांना संभाजी महाराजांना पकडण्यास यश मिळालं. त्यानंतर या दोघांचं काय झालं, हा एक महत्त्वाचं प्रश्न पडला असेल. त्यांना कोणतंही वतन मिळालं का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोडच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला होता. तसेच, पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जिऊबाई म्हणजे येसूबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला. त्यामुळे शिर्के कुटुंबाचा संबंध थेट छत्रपती घराण्याशी जोडला गेला.