Jitendra Awhad: आम्ही केलेलं चुकीचं, तुम्ही केलं तर... आव्हाडांनी नेमकी नाराजी कुणावर केली व्यक्त? पोस्ट व्हायरल

मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे...वैतागुन जितेंद्र आव्हाडांनी केलं ट्विट
Jitendra Awhad bodyguard Death Case
Jitendra Awhad bodyguard Death CaseEsakal

अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांच्या बदनामीचे आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढताना दिसून येत आहे. त्याचबरोबर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींवर पोलिस कारवाई करतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्यावर व्यक्तीवर पोलिसांऐवजी शिवसेनेतील पदाधिकारी कारवाई करतात आणि विरोधी पक्षातील व्यक्तीच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यावर त्यासोबत कसे वागतात याबद्दल लिहल आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड एक व्हिडिओ शेअर करत म्हणतात की, "मा महाराष्ट्र राज्याचे ना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्यावर आक्षेपार्य पोस्ट करणारा काँग्रेस ठाणे प्रवक्ता गिरीश कोळी ह्याला शिवसेना कोपरी उपविभाग प्रमुख बंटी बाडकर व त्यांचे सहकारी शिवसैनिक ह्यांनी चोप दिला तसेच ती आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्यात आली व माफी मागितली….".

Jitendra Awhad bodyguard Death Case
Pune Bypoll Election: कसब्यात पुन्हा पोटनिवडणूक होणार का? कायदेतज्ज्ञ काय सांगतात

पुढे ते लिहतात की, "हे इतर कुठल्या पक्षाच्या नेत्या साठी कार्यकर्त्यांनी केले तर ते गुंड .. मग पोलिस छळणार .. स्वता मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करणार … जेल मध्ये सडवणार हे सगळे मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे .. आणि मागचे ३५ दिवस तर सगळ्या मर्यादा पार".

तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला काही लोक मारहाण करताना दिसून येत आहेत. तर तू परत पोस्ट टाकली तर बघ. म्हणत त्याला माफी मागायला लावल्याचंही या व्हिडिओमधून दिसून येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओनंतर पोलिस मारहाण केलेल्या व्यक्तींवर कारवाई करणार का ही पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

त्याचबरोबर हे ट्विट मुख्यमंत्र्यांना आठवण करुन देणार आहे. अनंत करमुसे याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण केली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आक्षेप घेतला होता. याची आठवण या पोस्टच्या माध्यमांतून जितेंद्र आव्हाड यांनी करून दिली आहे.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनाही खोटे गुन्हे लावून अडकवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Jitendra Awhad bodyguard Death Case
महाविकास आघाडीचं ठरलं? प्रचार एकत्र, पण झेडपी, महापालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्र, कारण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com