Weather Update : पुढील दोन दिवस कसं असेल तुमच्या भागातील हवामान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update
Weather Update : पुढील दोन दिवस कसं असेल तुमच्या भागातील हवामान?

Weather Update : पुढील दोन दिवस कसं असेल तुमच्या भागातील हवामान?

sakal_logo
By
महेंद्र महाजन

गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून यामुळं हिवाळा सुरु असला तरी थंडी गायब झाली आहे. उलट लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून जोरदार पावसानंही विविध भागांमध्ये हजेरी लावली आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची स्थिती काय राहिल य़ाबाबत हवामान विभागानं माहिती दिली आहे.

Weather Update -

1) सांगली जिल्ह्यातील जत, खानापुर, कवठे महंकाळ, आटपाडी, तासगांव, वाळवा, पलुस, मिरज या भागांत २१-२२ तारखेला विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

2) सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर सोलापुर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यांमध्ये पुढील दोन दिवसात विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

3) पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, बोरी, नारायणगांव, कळंब या भागात २१-२२ तारखेला विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

4) साताऱ्यातील फलटण, खटाव, पाटण, महाबळेशवर या भागात २१-२२ नोव्हेंबर रोजी विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

5) तर नाशिक जिल्ह्यातील सटाणा, चांदवड, कळवण, येवला, निफाड, लासलगांव, सिन्नर, दिंडोरी या भागात २१-२२ तारखेला विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

loading image
go to top