Bharat Jodo Yatra: आदित्य ठाकरे 'भारत जोडो यात्रे'त कधी होणार सामिल? काँग्रेसनं दिली माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray_Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra: आदित्य ठाकरे 'भारत जोडो यात्रे'त कधी होणार सामिल? काँग्रेसनं दिली माहिती

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात दाखल होत आहे. या यात्रेत राज्यातील महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी होणार आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे देखील या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण त्यांच्या सहभागाबाबत सध्या संभ्रम असला तरी आदित्य ठाकरे मात्र यात सहभागी होणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे. (When will Aditya Thackeray participate in Bharat Jodo Yatra Info given by Congress)

नांदेड इथं बोलताना चव्हाण म्हणाले, भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वीच या यात्रेत सहभागासाठी गर्दी जमायला लागली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत की नाही, याची माहिती नाही. पण आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा: Abdul Sattar: सत्तारांच्या आक्षेपार्ह विधानानंतर CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक!

दरम्यान, भारत जोडो यात्रा सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथंपर्यंत पोहोचली आहे. भव्य मशाल यात्रेद्वारे ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे.