Santosh Bangar: मिशा स्वतः काढता की...; राऊतांचा बांगरांना टोला

शिवसेना आत्तापर्यंत जिथं लढत नव्हती तिथं उद्धव ठाकरे गटाचे पॅनल मोठ्या ताकदीनं निवडून आले.
Sanjay Raut Santosh Bangar
Sanjay Raut Santosh BangarSakal

मुंबई : महाविकास आघाडीची मोठी सभाही त्यांना लहान दिसायला लागली. इतका जळफळाट आणि पोटदुखीपणा राजकारणात बरा नाही. राजकारणात विरोधकही ताकदीचे असतात. विरोधक उद्याचे सत्ताधारी असतात हे जळफळाट करणाऱ्यांनी विसरु नये. कालच्या सभेला ऐक्याची वज्रमुठ दिसली. (When you remove mustache yourself Sanjay Raut slams to Sanjay Bangar)

Sanjay Raut Santosh Bangar
Maharashtra Politics: राज्य सरकारसमोर बच्चू कडूंनी हात टेकले; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केला मोठा खुलासा

जे ती एवढीशी सभा म्हणत असतील तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करुन घ्यावं लागेल. शिवसेनेकडून आम्ही नेत्रतपासणी शिबिर लावत आहोत. कालच्या सभेमुळं भाजपसारख्या लोकांना पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे. कालची सभा बघून भाजप आणि महाराष्ट्रातील गुप्त बैठका घेतली असेल आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका दहा वर्षे घेऊ नये असा एखादा ठराव मंजूर केला असेल एवढा कालचा प्रतिसाद होता. पण राज्यात आणि देशात सत्ताबदलाच्या दिशेनं पावलं पडत आहेत.

Sanjay Raut Santosh Bangar
IPL : यशस्वी जयस्वाल ‘लंबी रेस का घोडा’ ; श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा

शिवसेना आत्तापर्यंत जिथं लढत नव्हती तिथं शिवसेनेचे पॅनल मोठ्या ताकदीनं निवडून आले. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या आम्ही हारलो तर मिशा काढू, आता मिशा काढल्यात का बघा नाहीतर आम्ही इथून पाठवतो तुमची हजामत करायला.

Sanjay Raut Santosh Bangar
Barsu Refinery : बारसु रिफायनरी वाद पेटला; राजू शेट्टींना रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यास बंदी

उद्धव ठाकरे ६ मे रोजी कोकणात जातील सुरुवातीला ते बारसूमध्ये पोहोचतील तिथल्या ग्रामस्थांना भेटुन ते त्यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर ते महाडमध्ये सभेसाठी जातील. काही लोक म्हणतात कोकणात येऊ देणार नाही. पण कोकणातील जनता उद्धव ठाकरेंचं स्वागत करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com