सोलापुरातील १४८ अल्पवयीन मुली, तरुणी, महिला गेल्या कोठे? पोलिसांचा शोध सुरू, तरी सापडल्या नाहीत; दीड वर्षांत ८९६ बेपत्ता झाल्याची नोंद, पण...

सोलापूर शहरातील ११३ अल्पवयीन मुली व ७७३ तरुणी, महिला मागील दीड वर्षांत घरातून निघून गेल्याची नोंद सोलापूर शहर पोलिसांकडे झाली आहे. त्यातील मागच्या वर्षीच्या चार अल्पवयीन मुली व ८१ तरुणी आणि मागील सहा महिन्यांतील चार अल्पवयीन मुली व ६७ तरुणी, महिलांचा शोध लागलेला नाही. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Missing girl
Missing girlesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील ११३ अल्पवयीन मुली व ७७३ तरुणी, महिला मागील दीड वर्षांत घरातून निघून गेल्याची नोंद सोलापूर शहर पोलिसांकडे झाली आहे. त्यातील मागच्या वर्षीच्या चार अल्पवयीन मुली व ८१ तरुणी आणि मागील सहा महिन्यांतील चार अल्पवयीन मुली व ६७ तरुणी, महिलांचा शोध लागलेला नाही. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सोलापूर शहरातून २०२४ मध्ये ६०० अल्पवयीन मुली, तरुणी व महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी ५०० हून अधिक जणींना शोधून काढले आहे. दुसरीकडे या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत बेपत्ता झालेल्यांपैकी ७१ मुली, तरुणी सापडलेल्या नाहीत. दरम्यान, ज्या मुली, महिला, तरुणी अद्याप सापडल्या नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांकडून ‘आमची मुलगी सापडली का’, अशी सतत विचारणा होत आहे. पण, त्या नेमक्या गेल्या कोठे, या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी कोणाकडे नाही. प्रेमप्रकरण, विवाहाचे आमिष, कौटुंबिक आर्थिक स्थिती आणि प्रेमाचे आकर्षण यातून बऱ्याच मुली, तरुणी बेपत्ता झाल्याचे पोलिस सांगतात. काही महिला वैवाहिक अडचणींमुळे निघून जातात आणि काही दिवसांनी पुन्हा परत येतात, अशीही उदाहरणे आहेत.

ज्या महिला, तरुणी, अल्पवयीन मुलींना पोलिसांनी शोधले, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. अल्पवयीन मुली बेपत्ता होतात, तेव्हा अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. सुरवातीचे तीन महिने स्थानिक पोलिस तपास करतात, त्यांना ती अल्पवयीन मुलगी सापडली नाही तर त्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपविला जातो. त्यांच्या माध्यमातून तपास केला जातो. ४ ऑगस्टला मुलांना शाळेत सोडायला गेलेली कोणार्क नगरातील ३५ वर्षीय महिला दुचाकी शाळेजवळच लावून बेपत्ता झाल्याची नोंद सदर बझार पोलिसांत झाली आहे. पोलिस त्या महिलेचा शोध घेत आहेत.

सोलापूर शहरातील आकडेवारी

  • २०२४

  • जूनपर्यंत बेपत्ता अल्पवयीन मुली

  • ६१

  • न सापडलेल्या मुली

  • वर्षभरातील बेपत्ता महिला, तरुणी

  • ४९३

  • न सापडलेल्या तरुणी

  • ८१

---------------------------------------------------------

जून २०२५ पर्यंतची आकडेवारी

  • बेपत्ता अल्पवयीन मुली

  • ६२

  • न सापडलेल्या मुली

  • बेपत्ता तरुणी, महिला

  • २८०

  • न सापडलेल्या तरुणी

  • ६७

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रमाण अधिक

सोलापूर शहरात फौजदार चावडी, सलगर वस्ती, विजापूर रोड, सदर बझार, एमआयडीसी, जेलरोड व जोडभावी पेठ अशी सात पोलिस ठाणी आहेत. यापैकी महिला, तरुणी, अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक आहे. या परिसरात कामगार वर्ग मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com