

descendants of Bajirao and Mastani, including Nawab Shadab Ali Bahadur, preserving their historic Peshwa-Mastani family legacy in Madhya Pradesh, India
esakal
Mastani Descendants Life Now : मस्तानी ही बुंदेलखंडचे शूर राजा छत्रसाल यांची कन्या. छत्रसाल महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होते. जेव्हा मोगल सरदार महंमद बंगशने बुंदेलखंडवर आक्रमण केले, तेव्हा बाजीरावांनी खास मोहिमेद्वारे त्यांचे रक्षण केले. या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून महाराजांनी बाजीरावांना आपल्या तिसऱ्या पुत्राचा दर्जा दिला आणि झाशी, सागर, कालपी यांसारख्या प्रदेशांसह आपली कन्या मस्तानीचा हात त्यांच्या हातात दिला. अशा प्रकारे मराठा आणि बुंदेलखंड या दोन महान शक्तींचे नाते जोडले गेले.