cm eknath shinde bjp devendra fadanvis wins floor test maharashtra
cm eknath shinde bjp devendra fadanvis wins floor test maharashtra esakal

Cabinet Expansions: कोणाच्या दारापुढे ‘लाल’ दिव्याची गाडी? मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला मिळणार संधी

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार

बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षीत राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी (ता.११) सुप्रिम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार, लाल दिव्याच्या गाडी कोण्या वजनदार आमदाराच्या दारापुढे उभी राहणार, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा ‘राजा’ कोण बनणार? याबद्दल एकीकडे चर्चा सुरु झाली असताना दुसरीकडे, इच्छुकांकडून आपल्या गॉडफादरांकडे ‘लॉबिंग’ सुरु झाले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावर निर्णय होऊ द्या, मग मंत्रिमंडळ विस्ताराचे पाहु, असे सांगत इच्छुकांची बोळवण करुन संबंधितांना आजवर थोपवून धरण्यात आले. दरम्यान, अखेर न्यायालयाचा निकाल आला. राज्यातील विद्यमान शिंदे -फडणवीस सरकार वाचले. तद्‌नंतर मंत्रीमंडळाच्या विस्ताराचे भिजत घोंगडे काढा असा नारा देत इच्छुकांमधून आता दबाव वाढू लागला आहे.

मंत्रीमंडळाच्या विस्तारात साधारण राज्यातील २३ आमदार चेहऱ्यांना संधी मिळू शकते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सहा ते सात आणि सरकारमधील सहयोगी भाजपला १६ ते १७ मंत्रिपदे मिळू शकतात.

cm eknath shinde bjp devendra fadanvis wins floor test maharashtra
Karnataka Assembly Election Results 2023 : भाजपला मोठा धक्का! भाजपचे 8 कॅबिनेट मंत्री पिछाडीवर

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नावे साधारणपणे मंत्रिपदासाठी भाजपकडून चर्चेत आहेत. माढा लोकसभा मतदार संघ तसेच माळशिरस, माढा आणि करमाळा या विधानसभेच्या मतदार संघांमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे चर्चेतले काम हे प्रदेश भाजपही त्यातही महाराष्ट्राचे भाजपचे देवेंद्र यांना माहिती आहे. शिवाय रणजितसिंह मोहिते-पाटील हे सिनिअर आहेत.

कामाचा प्रचंड आवाका आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधील मोहिते-पाटील घराण्याचा वेगळा ठसा आहे, शिवाय बारामतीकर काका-पुतण्याला फाईट देण्याची धमक आहे. पडत्या काळात भाजप विस्तारासाठी मोहिते-पाटील परिवाराचे मोठे योगदान राहिले. मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवेळी त्यांच्या नेतृत्वाचा ‘करिष्मा’ भाजपला बघायला मिळाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर, मंत्रिपदासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

cm eknath shinde bjp devendra fadanvis wins floor test maharashtra
Karnataka Election Result : काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर; प्रमुख नेते पिछाडीवर

सोलापूर जिल्ह्यात भाजपचे ‘कमळ’ फुलविताना आमदार राजेंद्र राऊत यांचे नेतृत्व प्रत्येकवेळी चमकदार दिसले आहे. राऊत यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूप काही माहिती आहे. श्री फडणवीस यांनी मनावर घेतल्यास मंत्रीमंडळाच्या विस्तारात सोलापूर जिल्ह्यातून बार्शीची सरशी झाली तर त्यात नवल वाटू नये.

सोलापूर उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख हे एकनिष्ठ आहेत. तसेच ते सिनिअर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश भाजपमधील अनेक वरिष्ठांशी त्यांचे चांगले रिलेशन आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मंत्रिमंडळ नावावेळी देवेंद्र फडणवीस हे कोणती सोंगटी फिरवतात त्यावर देशमुखांच्या ‘लाल’ दिव्याचे भवितव्य अवलंबून आहे.

cm eknath shinde bjp devendra fadanvis wins floor test maharashtra
Karnataka Election Result :भाजप काँग्रेसच्या चुरशीच्या लढाईत राहुल गांधींचे सूचक ट्विट

प्रदेशसह राष्ट्रीय पातळीवर वट्ट असलेले केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे गॉडफादर असलेल्या आमदार सुभाष देशमुख यांचेदेखील मंत्रिपदासाठी नाव आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्त लाभल्यास सुभाष देशमुखांना लाल दिवा मिळू शकतो. श्री. देशमुख यांनी मंत्रिपदासाठी सेटिंग लावून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यांना मंत्रिपद देण्यात देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या वाट्याला १६ किंवा १७ मंत्रिपदे आहेत. सोलापूर जिल्ह्याला एक पद निश्‍चित मिळू शकते. यापदावर कोण बाजी मारणार? याचे उत्तर येणाऱ्या काळाकडे असेल हे निश्‍चित.

मुख्यमंत्री शिंदे गटापुढे मोठी डोकेदुखी

राज्य सरकारमध्ये सहयोगी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटापुढे मंत्रिमंडळ विस्ताराची डोकेदुखी आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. या गटात सहभागी असलेले तब्बल ४० जण मंत्रिपदासाठी म्हणजे ‘लाल’ दिव्यासाठी इच्छुक आहेत. मात्र या गटाच्या वाट्याला केवळ सहा ते सात मंत्रिपदे येतील. अशा परिस्थिती कोणाला मंत्रिपद द्यायचे? कोणाची समजूत काढायची? कोणी बंड केले तर त्या संबंधितांचे बंड कसे शमवायचे? याची मोठी डोकेदुखी आणि आव्हान मुख्यमंत्री शिंदे गटापुढे आहे.

सांगा, सांगा, सांगोल्याच्या पाटलाचं काय?

महाविकास आघाडी सरकार खाली खेचत राज्यात सत्तांतराचा ऐतिहासिक चमत्कार घडवून आणण्यात योगदान राहिलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना मुख्यमंत्री शिंदे गटामधून मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, नामदार प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान दिलेले आहे.

नामदार सावंत यांचे मंत्रिपद उस्मानाबाद जिल्ह्याच्या कोट्यातून गृहीत धरल्यास आमदार शहाजी पाटील यांचे नाव सोलापूर जिल्ह्यातून पुढे येऊ शकते. शिंदे गटाला अवघी सात मंत्रिपदे आहेत. यामध्ये ४० जणांना न्यास कसा द्यायचा, याच्या पेचात आमदार शहाजी पाटील यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडील वजन आणि नशिबाचे स्टार कितपत कामी येतील याचे उत्तर येणाऱ्या काळाकडेच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com