पोलिस शिवसेनेच्या आमदारांना म्हणाले, 'तुम्ही कोण?'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

कोल्हापूरमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर बैठक बोलावली होती. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या आमदारांसोबत हा प्रकार घडला.

मुंबई : सह्याद्री गेस्ट हाऊसवर कोल्हापूरमधील शिवसेनेच्या चंद्रदीप नरके, उल्हास पाटील आणि जयप्रकाश मुंदडा या आमदारांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्या आमदारांना 'तुम्ही कोण' असा प्रश्न पोलिसांकडून करण्यात आला. तसेच आमदारांना आत सोडण्यास नकार मिळाल्याने पोलिस आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाली. मुख्यमंत्र्यांनी स्वत: मध्यस्ती केल्यानंतर आमदारांना आत सोडण्यात आले.

कोल्हापूरमध्ये नुकत्याच आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर बैठक बोलावली होती. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या आमदारांसोबत हा प्रकार घडला.

पोलिसांनी 'प्रोटोकॉल'चा मुद्दा पुढे करत या आमदारांना 'सह्याद्री' गेस्ट हाऊसच्या गेटवर रोखत आत सोडण्यास नकार दिला. याच कारणाने पोलिस आणि आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले. कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर घडला प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमदारांना पूरग्रस्तांच्या बैठकीसाठी आत बोलवलं चर्चा केली. 

या सर्व प्रकारानंतर झालेल्या बैठकीत पूरग्रस्तांचं झालेल्या नुकसानासंदर्भात निर्णय घेण्यात आले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना अडीच एकरी 60 हजार रुपयांची मदत देणार, ज्या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतलं नाही, त्यांना हेक्टरी 39 हजार रुपयांची मदत केली जाणार, उसाचं गाळप करणाऱ्या गुरांळाना बांधकामासाठी 50 हजार देणार, राज्य सरकारच्या अध्यादेशामधील जाचक अटी काढून सरसकट मदत करणार. तसेच ज्या शेतकऱ्यांचा ऊस रानामध्ये कुजतोय, अशा शेतकऱ्यांचा ऊस रानातून बाहेर काढण्यासाठी रोजगार हमी योजनेचा निधी आणि कामगार वापरणार याबाबत बैठकीत निर्णय झाल्याचं समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who are you Police questioning to Shiv Sena MLAs