Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांना एवढ्या उपाध्या कुणी आणि कशा दिल्या?

शिवाजी महाराजांना शेरशिवराज, श्रीमंतयोगी यासोबत असे अनेक बिरूदं आहेत. ते कुणी दिले? त्यावरून सध्या वाद सुरू झाले आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajSakal

विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेच्या अधिवेशनात संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते' या वक्तव्यावरून शिंदे गट आणि भाजपचे नेत्यांकडून त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय. तर राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाडांनीही औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य केलं. खासदार अमोल कोल्हेंनीसुद्धा संभाजीराजे धर्मवीर असल्याचे पुरावे इतिहासात नसल्याचं सांगतिलंय. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाच्या नावापुढे 'जी' लावल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.

हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

या सगळ्या वादानंतर संभाजी महाराजांना धर्मवीर बिरूद लावायचं की स्वराज्यरक्षक? हा प्रश्न आता उपस्थित झालाय. तर शिवाजी महाराजांनासुद्धा एकापेक्षा अनेक उपाध्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणल्याने त्यांना मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं होईल असं अजित पवार म्हणाले होते त्यामुळे महाराजांच्या उपाध्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पण शिवाजी महाराजांना या उपाध्या कशा प्राप्त झाल्या किंवा कुणी आणि कशा दिल्या हे आपल्याला माहितीये का?

Chhatrapati Shivaji Maharaj
BJP MLA Laxman Jagtap Death : कट्टर समर्थक असतानाही पवारांशी 2 वेळा पंगा घेणारे जगताप

शिवाजी महाराजांच्या नावापुढे कुणी काय काय बिरूदं लावली?

स्वराज्य संस्थापक

त्यांनी मुघलांशी लढा देऊन पहिल्या स्वराज्याची स्थापना केली म्हणून त्यांना हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हटलं जातं.

छत्रपती

इ.स. १६७४ मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना छत्रपती हे बिरूद लागलं.

शेरशिवराज

शिवरायांच्या काळातील तत्कालीन कवी, कवी भूषण यांनी त्यांना शेरशिवराज हे बिरूद लावलं होतं.

गोब्राह्मणप्रतिपालक

काही इतिहासकारांनी आपल्या कादंबरी, पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या नावापुढे गोब्राह्मणप्रतिपालक असं बिरूद लावलं. काहीजणांकडून हे बिरूद इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी लावल्याचा दावा केला जातो.

जाणता राजा

रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांच्या नावापुढे जाणता राजा हे बिरूद लावलं.

रयतेचा राजा

काही इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख रयतेचा राजा म्हणून केला.

कुळवाडीभूषण

महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांचा कुळवाडीभूषण म्हणजे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे भूषण असा उल्लेख केला.

हिंदूनृसिंह

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शिवरायांना हिंदूनृसिंह अशी उपाधी दिली.

श्रीमंतयोगी

रणजित देसाई यांच्या पुस्तकानंतर शिवरायांना श्रीमंतयोगी असं बिरूद लागलं.

छत्रपती शिवाजी महाराजांना असलेल्या बिरूदावरून अनेकवेळा वाद उफाळताना दिसतात. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा महात्मा फुलेंनी दिलेल्या कुळवाडीभूषण या बिरूदाचा वापर करतात तर गोब्राह्मणप्रतिपालक आणि जाणता राजा या बिरूदाचा विरोध करताना दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com