Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, एकनाथ शिंदेची निवडणूक आयोगाकडे मागणी; उद्या होणार निर्णय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, एकनाथ शिंदेची निवडणूक आयोगाकडे मागणी; उद्या होणार निर्णय?

दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय ती म्हणजे शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्हाची. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता आहे. अशातच, धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (who get dhanushyaban election commission shiv sena symbol 07 october Eknath Shinde Uddhav Thackeray )

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात शिंदे गटाने हा दावा केला आहे. तत्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंतीही शिंदे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे. उद्धव ठाकरे यांनी एकही कागदपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे ठाकरे गट जाणून बुजून वेळ काढत असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.

शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार? या संदर्भात उद्या शुक्रवारी 7 सप्टेंबरला निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कागदपत्रं सादर करणार आहेत.

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची कायदेशीर लढाईबाबत वकिलांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. आयोगात प्राथमिक रिप्लाय कधी सादर करायचा, यावर बैठकीत विचार होणार आहे. आयोगामध्ये प्राथमिक रिप्लाय दिल्यानंतर कागदपत्रे दाखल करण्यासाठी शिवसेना वेळ मागण्याची शक्यता आहे.