
दत्तात्रय भरणे यांची कृषीमंत्री म्हणून नियुक्ती झाली असून, ते शेतकरी कुटुंबातून येतात.
त्यांनी यापूर्वी क्रीडा व सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
कर्जमाफी, पीक विमा व शेतीत नवकल्पनांवर आता त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Who is Agriculture Minister Dattatray Bharne :
महाराष्ट्राच्या राजकारणात दत्तात्रय विठोबा भरणे हे नाव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या ते राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून नियुक्त झाले असून, यापूर्वी त्यांनी क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले भरणे यांचा राजकीय प्रवास खडतर आहे. यापूर्वी क्रिडामंत्री असल्यामुळे त्यांचा हा प्रवास खेळाच्या मैदानापासून थेट शेतापर्यंतचा असेल, ज्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी थेट जोडले गेले आहे.