MP Prataprao Jadhav: प्रतापराव जाधवांना मंत्रिपद! सलग चारवेळा लोकसभेत; सरपंच ते खासदार; कसा आहे राजकीय प्रवास?

MP Prataprao Jadhav: आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
MP Prataprao Jadhav
MP Prataprao JadhavEsakal

MP Prataprao Jadhav: आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून अनेक मंत्र्यांना फोन केले जात आहे. तिसऱ्यांदा स्थापन होणाऱ्या या मोदी सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात असल्याची माहिती आहे.

नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, पियूष गोयल रामदास आठवले,जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आल्याची माहिती आहे. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे. रामदास आठवले यांनाही फोन आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याची माहिती आहे.

MP Prataprao Jadhav
Lok sabha Election Result : युती-आघाडीत अंतर्गत धुसफूस;पाडापाडीच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप

सलग तिसऱ्या टर्ममध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवणारे प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम साधला आहे. यावेळी त्यांना केंद्रीय मंत्रीपदासाठी फोन आल्याची माहिती आहे. 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी ठरले आहेत. त्यामुळे यावेळी त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

MP Prataprao Jadhav
Devendra Fadnavis: विधानसभा जिंकण्याची व्यूहरचना तयार : फडणवीस ;जनाधार कायम,समन्वयाचा अभाव आणि खोट्या ‘नरेटिव्ह’मुळे पराभव

प्रतापराव जाधव यांची माहिती

प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती.

MP Prataprao Jadhav
PM Modi Oath Ceremony : 'या' दोन दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणं अशक्य; अखेर शपथविधीसाठी आला फोन

प्रतापराव जाधवांचा राजकीय प्रवास

प्रतापराव जाधव सरपंचपदापासून खासदारकीपर्यंत पोहोचले आहेत. मेहकर तालुक्यामधून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली होती ते आज दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. संरपंच पदापासून प्रवास सुरू झाल्यानंतर प्रतापराव जाधवांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. 1999 आणि 2004 या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी मतदारसंघात आपली पकड मजबूत ठेवली होती.

शिवसेनेने प्रतापराव जाधवांना 2009 साली त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलं. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 साली देशभरात मोदी लाट असल्यामुळे प्रतापराव जाधव यांचा पुन्हा एकदा मार्ग मोकळा झाला होता. तर 2019 मध्ये त्यांच्यासमोर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे उभे होते.

MP Prataprao Jadhav
Sonia Gandhi : काँग्रेस संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी,सोनियांचा हल्लाबोल;अनेकांनी आमचे मृत्युलेख लिहिले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com