नितीन देशमुखांचा गॉडफादर कोण? त्यांच्या शब्दावरून घेतला ‘यू टर्न’!

Who is the Godfather of Nitin Deshmukh Arvind Sawant Sanjay Dhotre
Who is the Godfather of Nitin Deshmukh Arvind Sawant Sanjay DhotreWho is the Godfather of Nitin Deshmukh Arvind Sawant Sanjay Dhotre

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी आपल्याला जबरदस्ती सुरतला घेऊन गेल्याचे पत्रकारांना सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला भेटण्यासाठी बोलावले होते. भेट घेण्यासाठी गेल्यावर गाडीत बसवून न सांगता गुजरातमध्ये नेल्याचे सांगितले. कशी तरी सुटका करून जिवंत परतू शकल्याचे ते म्हणाले. मात्र, नितीन देशमुख यांचे ‘यू टर्न’ घेण्यामागचे खरे कारण माहिती असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया यामागील कारण... (Who is the Godfather of Nitin Deshmukh Arvind Sawant Sanjay Dhotre)

बाळापूर विधानसभा मतदारसंघातून सन २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नितीन देशमुख (Nitin Deshmukh) निवडून आले. त्यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख आहे. तसेच त्यांचे भाजपचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांच्या सोबतची निकटता सर्वश्रुत आहे. तसेच धोत्रे यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहे. खासदार धोत्रे गटाचे विरोधक मानल्या जाणारे भाजपचे बाळापूर मतदारसंघातील तत्कालीन उमेदवार नारायणराव गव्हाणकर यांच्या विरोधात सन २००९ मध्ये नितीन देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयी करण्यासाठी खासदार धोत्रे यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. धोत्रे यांच्या सहकार्यानेच बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचा पहिला आमदार हाेण्याचा मान नितीन देशमुख यांना मिळाला. देशमुख यांच्या विजयासाठी धोत्रे गटाने केलेल्या प्रयत्नामुळेच ते आमदार झाल्याचे सर्वत्र बोलले जाते.

Who is the Godfather of Nitin Deshmukh Arvind Sawant Sanjay Dhotre
राजकारणातील ‘अँग्री यंग मॅन’ बच्चू कडू एकनाथ शिंदेंसोबत का गेले?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आमदार नितीन देशमुख त्यांच्यासोबत गेले. कारण, एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. यातूनच त्यांनी भाजपच्या गोटात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेतील नितीन देशमुख यांचे ‘गॉडफादर’ असलेले खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना ‘यू टर्न’ घेण्यास भाग पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अरविंद सावंतांमुळे मिळाली उमेदवारी

अकोला जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची कमान तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली होती. खासदार अरविंद सावंत यांच्या आशीर्वादानेच बाळापूर मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीकडून त्यांना उमेदवारीही मिळाली होती.

देशमुखांचा विरोध गट संपविण्यास केले सहकार्य

खासदार अरविंद सावंत यांच्यामुळे आमदार नितीन देशमुख यांना शिंदे गट सोडून माघारी फिरावे लागल्याचे बोलले जात आहे. खासदार अरविंद सावंत यांनी अकोला जिल्ह्यातील शिवसेनेमधील नितीन देशमुख यांचा विरोध गट पद्धतशीरपणे संपविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

Who is the Godfather of Nitin Deshmukh Arvind Sawant Sanjay Dhotre
रामदास आठवलेंचे खरी शिवसेना बाबत मोठे विधान, म्हणाले...

शिवसेनेने रचला माघारी बोलविण्याचा डाव

अडीच वर्षांत खासदार सावंतांच्या मदतीनेच कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना व नगरविकास खात्यातून मोठा निधीही आमदार नितीन देशमुख यांनी मिळविला होता. त्यामुळे अरविंद सावंत यांचा एक शब्दही आमदार नितीन देशमुख खाली जाऊ देणार नाहीत, याची कल्पना शिवसेनेला होती. यामुळेच एकनाथ शिंदे गटातून नितीन देशमुख यांना बाहेर काढत माघारी बोलविण्याचा डाव शिवसेनेच्या मुंबईतील धुरीणांनी यशस्वी करून दाखविला आहे.

बंड पुकारणारे आमदार नेमके किती?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड पुकारणे दोन ते तीनच आमदार परत आले आहेत. यापैकी दोघांनी आज पत्रकार परिषदेत घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. दुसरीकडे बंड पुकारलेल्या आमदारांपैकी पंधराच्या जवळपास आमदार शिवसेनेसोबत असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे. ते परत आल्यानंतर शिवसेनेसोबत असतील, असेही राऊत म्हणाले. यामुळे बंड पुकारणारे आमदार किती असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

स्वाक्षऱ्या केलेले आमदार फुटणार का?

एकनाथ शिंदे गट शुक्रवारी (ता. २४) आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडे ४२ आमदारांचे संख्याबळ असल्याचे पत्र पाठवण्यात येणार आहे. या पत्रावर शिंदे गटासोबत राहणाऱ्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या राहणार आहेत. यामुळे या स्वाक्षऱ्या कोणत्या धमकीपोटी तर केल्या जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com