कोण होणार भाजप प्रदेशाध्यक्ष?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

भारतीय जनता पक्षाच्या आगामी प्रदेशाध्यक्षाची निवड  येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात करण्यात येणार असून, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का, तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावणे येणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या आगामी प्रदेशाध्यक्षाची निवड  येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात करण्यात येणार असून, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का, तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावणे येणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रात बोलावणे आले तर त्यांच्या जागी म्हणजे विधान सभेचे विरोधी पक्षनेते म्हणून चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागेल, तर प्रदेशाध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे अथवा पंकजा मुंडे यांच्यापैकी एकाला संधी दिली जाईल. भाजपच्या जिल्हा तथा शहर पातळीवरील संघटनात्मक बदल पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच मुंबई प्रदेशाध्यक्षाचीही निवड करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be the BJP state president?