अनिल कपूरला मुख्यमंत्रीपदाची ऑफर; त्यावर अनिल कपूर म्हणतो...

वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

'नायक' चित्रपटाचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी अभिनेते अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मांडला आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेत खुद्द अनिल कपूरही सहभागी झाले असून, त्यांनी मी 'नायक'च ठिक आहे असे उत्तर दिलं आहे.

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचे वेध सगळ्यांना लागले आहेत.  शिवसेना आणि भाजप या दोघांमधील मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. नेत्यांच्या वक्तव्यांमुळे हे मतभेद वाढत आहेत. जनतेने कौल देऊनही सरकार स्थापन होत नसल्याने सोशल मीडियावरून आता एक नवा प्रस्ताव लोकांनी मांडला आहे.

'नायक' चित्रपटाचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी अभिनेते अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मांडला आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेत खुद्द अनिल कपूरही सहभागी झाले असून, त्यांनी मी 'नायक'च ठिक आहे असे उत्तर दिलं आहे.

भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली आणि त्यांना बहुमतही मिळालं मात्र सत्तेतल्या वाट्यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले असून निकाल लागून सहा दिवस झालेत तरी आणखी राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. सोशल मीडियावर अनिल कपूरविषयी हा प्रस्ताव व्हायरल होत असून लोक राजकीय पक्षांना टोले हाणत आहेत.

दरम्यान, 2001मध्ये अनिल कपूर यांचा 'नायक' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रचलित व्यवस्थेला आव्हान देत अनिल कपूर धडाकेबाज कामगिरी करतो आणि एक दिवसांचा मुख्यमंत्री बनतो. राणी मुखर्जी, परेश रावल, अमरीश पुरी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. पत्रकार असलेला अनिल कपूर हा सत्तेला आव्हान देत आपला दरारा निर्माण करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be Maharashtra Chief Minister? Fans pick Anil Kapoor His reply bowls Internet over