

Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशमुख यांचा खून, वाल्मिक कराडचे दाखल झालेला मोका यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. आमदार सुरेश धस नैतिकतेच्या दृष्टीकोनातून राजीनाम्याची मागणी केलीय तर राष्ट्रवादीचे काही आमदार, तसेच अंजली दमानिया आणि विरोधी पक्षांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.