Kasba ByElection : कसबा, चिंचवडमध्ये रात्री-अपरात्री फिरण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर का आली?

Kasba Chinchwad ByElection
Kasba Chinchwad ByElectionesakal

पुणेः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या चांगलेच सक्रीय झाले आहे. सध्या कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत ते रात्री-अपरात्री कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. यामुळे शिंदे इतक्या रात्री का फिरतायत? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाची सुनावणी सुरुय. तर दुसरीकडे कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरुय. ही पोटनिवडणूक सगळ्या पक्षांसाठी प्रतिष्ठेची झालीय. महाविकास आघाडीकडून शरद पवार, नाना पटोले, अजित पवार, यांच्यासह विविध दिग्गज नेते स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर तिकडे भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात दिसून येत आहे. या सगळ्यात चर्चा आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रात्रीच्या प्रचार भेटीची. मुख्यमंत्री शिंदे रात्रीच कसबा, चिंचडवमध्ये का फिरतायत? काय आहेत राजकीय गणितं?

पदवीधर निवडणुकीत फटका बसला म्हणून...

कसबा पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीचा प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. कसब्यात भाजपाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांच्या जोरदार मुख्य लढत होत आहे. तर तिकडे चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत आहे. या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार चर्चा होत आहे. त्याचं कारण म्हणजे रात्री २ वाजता तर कधी ३ वाजता मुख्यमंत्री कार्यकर्त्यांची भेटी घेत आहे. इतकंच नाही तर ते भाजपाच्या उमेदवारांनी भेटतातय. या सगळ्यामागे काय कारण आहेत?

यावर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणतात, राज्य सरकारला म्हणजेच भाजप-शिंदे सरकारला अमरावती, नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये बसलेला फटका पाहता, या निवडणुकीत फटका बसू नये. इतकचं नाही तर लोकांचं सरकारवरील विश्वास कायम राहावा आणि मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत म्हणूनच ते जास्तीत जास्त फिरत आहेत.

रवींद्र धंगेकरांची लोकप्रियता...

ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री उशीरा फिरणे यात काही गैर नाही. कसबा,चिंचवड पोटनिवडणूक ही भाजप शिवसेनेला एक अग्नीपरीक्षेसारखी वाटत आहे. कारण महाविकास आघाडीने दिलेले रवींद्र धंगेकर हे उमेदवार लोकप्रिय आहे. शिवाय ब्राम्हण समूदायाला उमेदवारी न दिल्यामुळे जातीय प्रचार याठिकाणी सुरु आहे. पोटनिवडणूक ही सगळ्या पक्षासाठी प्रतिष्ठेची असते. पोटनिवडणुकीचा इतिहास पाहता सत्ताधारी पक्ष पराभूत होतात. त्यामुळे हे होवू नये यासाठी मुख्यमंत्री ते फिरत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंची रात्री उशीरा काम करण्याची शैली असल्यामुळे ते रात्री फिरत आहेत.''

एकनाथ शिंदेंना रात्रीच्या भेटीगाठींची सवय

मुख्यमंत्र्यांच्या याच रात्रीच्या फिरण्याबाबत 'सरकारनामा'चे संपादक उमेश घोंगडे म्हणतात, आनंद दिघे हेदेखील त्यावेळी रात्री-अपरात्री लोकांना भेटत होते. दिघेंसोबत एकनाथ शिंदेंही लोकांच्या भेटी घेत होते. त्यामुळे तेव्हापासूनच शिंदेंना रात्री उशिरापर्यंत लोकांना भेटण्याची सवय आहे. शिवाय आता ते मुख्यमंत्री असल्यामुळे दिवसभरात नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते आता कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत रात्रीच्या वेळी भेटी घेत आहेत.

असं असलं तरी नुकतीच आज मुख्यमंत्री शिंदे यांनी कसबामध्ये जावून टिळक कुटुंबियांची भेट घेतली. त्यामुळे वारंवार टिळक कुटुंबियांची भेट मुख्यमंत्री का घेत आहेत? नक्की पोटनिवडणुकीच्या अंतिम टप्प्यात काय घडतंय? असा सवालही उपस्थित केला जातोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरा भेटी-गाठीचा परिणाम निवडणूक निकालात दिसणार का हे पाहणं महत्वाचं असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com