वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याने भरावयाची रक्कम बंद होते व पेन्शन सुरू होते. देशभरातील लाखो शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.
Prime Minister Kisan Maandhan Yojana : नोकरी करीत असलेल्या व्यक्तींना पेन्शन मिळते. तथापि, शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आधार म्हणून यापूर्वी योजना नव्हत्या. केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांचाही विचार करून काही योजना तयार केल्या. त्यातीलच एक योजना म्हणून प्रधानमंत्री किसान मानधन योजना २०१९ मध्ये सुरू केली.