तापमान का वाढतेय? दीड महिन्यांत बाष्पीभवनातून उडाले उजनीतील २ टीएमसी पाणी; उद्या धरण मायनसमध्ये जाणार; सोलापुरात वीजेची मागणी १७०० मेगावॉटवर

१२० टीएमसी क्षमतेचे उजनी धरण सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिव या शहर-जिल्ह्यांसाठी वरदान आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत धरण अजूनही उपयुक्तसाठ्यात (प्लसमध्ये) आहे. पण, उन्हाची तीव्रता वाढल्याने १ मार्च ते १५ एप्रिल या दीड महिन्यातच धरणातील दोन टीएमसी पाणी बाष्पीभवनामुळे कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
 तापमान वाढले
तापमान वाढलेsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील १२० टीएमसी क्षमतेचे उजनी धरण सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिव या शहर-जिल्ह्यांसाठी वरदान आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत धरण अजूनही उपयुक्तसाठ्यात (प्लसमध्ये) आहे. पण, उन्हाची तीव्रता वाढल्याने १ मार्च ते १५ एप्रिल या दीड महिन्यातच धरणातील दोन टीएमसी पाणी बाष्पीभवनामुळे कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

उजनी धरणातून सध्या भीमा नदीतून सहा हजार क्युसेक, मुख्य कालव्यातून तीन हजार क्युसेक, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून सव्वाचारशे क्युसेक आणि बोगद्यातून ६८० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे दररोज धरणातील पाणीसाठा दोन टक्क्यांनी (एक टीएमसी) कमी होत आहे. भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी आणखी चार दिवस (१९ एप्रिलपर्यंत) सुरूच राहणार आहे. याशिवाय कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून शेतीसाठी सोडलेले पाणी २५ मेपर्यंत सुरू असणार आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरण १७ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उणे पातळीत जाणार आहे.

पाणी जपून वापरावेच लागणार

२९ डिसेंबरपर्यंत धरण १०० टक्के (एकूण पाणीसाठा ११७ टीएमसी) भरलेले होते. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा ६६ टीएमसीपर्यंत खाली आला आहे. साडेतीन महिन्यांत निम्मे धरण रिकामे झाले असून या काळात धरणातील तब्बल ५१ टीएमसी पाणी कमी झाले आहे. आता धरणात ६६ टीएमसी पाणी असून त्यातील आणखी चार टीएमसी पाणी बाष्पीभवनातून जाईल, असा अंदाज आहे. याशिवाय २५ मेपर्यंत धरणात ५३ टीएमसी पाणी शिल्लक राहील, ते उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यासाठी सर्वांनीच पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.

उकाडा वाढला, विजेची मागणी ११०० मेगावॉटवर

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मागील तीन-चार दिवसंपासून तापमानाचा पारा ४१ अंशावर पोचला आहे. जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमधील वीजेची मागणी २०० मेगावॉटने वाढली आहे. जानेवारीत १३७३ मेगावॉटवरील वीजेची मागणी सध्या १७०० मेगावॉटवर गेली आहे. पत्राशेडमधील लोकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहतील, असा उन्हाचा उकाडा आहे. दुसरीकडे शहरी भागातील कुटुंबातील कुलर, फ्रिज, पंखे, एसी २४ तास सुरूच ठेवले जात असल्याचीही स्थिती आहे. सरकारी कार्यालयांमधील एसी, पंखे देखील कायम सुरू असून काहींनी कुलर आणले आहेत. घरातून बाहेर पडल्यावर कडक उन्हाळा काय असतो, याची प्रचिती एप्रिलच्या सुरवातीपासूनच येऊ लागली आहे.

पिकांनी माना टाकल्याने शेतीसाठी देखील वीज जास्त लागत आहे. सोलापूर शहरासाठी दरमहा सरासरी १४० मेगावॉट वीज लागते, पण कडक उन्हाळ्यामुळे ही मागणी आता २२० मेगावॉटपर्यंत पोचली आहे. पूर्ण मे महिन्यात तापमानाचा पारा ४२ अंशांवर राहील, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात वीजेची मागणी आणखी वाढू शकते, असे ‘महावितरण’चे अधिकारी सांगतात.

‘या’मुळे वाढतोय तापमानाचा पारा

हवेतील धूळ, आगीतून आणि वाहने, कंपन्यांमधून बाहेर पडणारा कार्बनडायऑक्साईड, सल्फरडायऑक्साईड (ग्रीन हाऊस गॅस) असे वायू हवेत छत्रीप्रमाणे काम करतात. जमीन गरम झाल्यावर तेथून हवेत मिसळणारी उष्णता त्या वायूमुळे (ग्रीनहाऊस गॅसेस) पुन्हा जमिनीवर येते. त्यामुळे उष्णता दिवसेंदिवस वाढत असून त्यात आणखी वाढ होऊ शकते. त्यावर वृक्ष लागवड, पर्यावरणपूरक वाहनांचा वापर करणे हेच प्रमुख उपाय आहेत.

- रमेश दास, संशोधक, सोलापूर संशोधन केंद्र

चार महिन्यातील विजेची मागणी

  • जानेवारी : १३७३ मेगावॉट

  • फेब्रुवारी : १४८६ मेगावॉट

  • मार्च : १५०९ मेगावॉट

  • एप्रिल : १७०२ मेगावॉट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com