भारतात राणीच्या मृत्यूचा दुखवटा का? कॉ. प्रकाश रेड्डींचा PM मोदींना सवाल

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ९६ व्या वर्षी नुकतचं निधन झालं.
Prakash Reddy_PM Modi
Prakash Reddy_PM Modi

मुंबई : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळानं नुकतंच निधन झालं. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणीला श्रद्धांजली वाहिली आणि भारतात राणीच्या मृत्यूनिमित्त ११ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. पण यावर आता डाव्या पक्षाच्या नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. भारतात राणीच्या मृत्यूचा दुखवटा का? असा सवाल कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी केला आहे. (Why state morming of death on queen Elizabeth II question raised by Comrade Prakash Reddy to PM Modi)

कॉ. प्रकाश रेड्डी यांनी याबाबत फेसबूक पोस्ट लिहिली असून यामध्ये त्यांनी भारत सरकारला अनेक सवाल केले आहेत. यामध्ये ते म्हणतात, "ब्रिटनच्या राणीच्या निधनामुळं भारतात राष्ट्रीय दुखवटा का? ब्रिटनच्या राजघराण्यानं, ब्रिटिश सरकारनं 'जालियनवाला बाग हत्याकांडा'बद्दल माफी मागीतली काय? राणीच्या मुकुटातील हिरे हे आफ्रिकन खाणीतून लूटून आणले गेले आहेत. याला ब्लड डायमंड असं म्हणतात. ब्रिटिशांनी लूटून नेलेला 'कोहिनूर हिरा' (Jewel Of The Crown) ब्रिटनचं राजघराणं, ब्रिटीश सरकार आपल्याला परत देणार आहे काय? स्वातंत्राच्या ७५ वर्षानंतरही ही कॉमनवेल्थची मानसिकता का? राजेशाही रद्द करा"

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर ट्विटद्वारे शोक व्यक्त केला होता. मोदी म्हणाले, "महाराणी एलिझाबेथ द्वितीय या आपल्या काळातील एक दिग्गज व्यक्ती म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिलं. त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा आणि सभ्यतापूर्ण व्यवहार केला. त्यांच्या निधनानं मला दु:ख झालं असून या दुःखाच्या प्रसंगी माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि यूकेच्या लोकांसोबत आहेत"

गृहमंत्रालयानं जाहीर केला राष्ट्रीय दुखवटा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतानं दु:ख व्यक्त केलं. तसेच त्यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबतचे आदेश काढलेत. त्यानुसार, आता रविवार, 11 सप्टेंबरला संपूर्ण भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com