esakal | राज्यात वाघांच्या मृत्यूंची संख्या का वाढलीय?
sakal

बोलून बातमी शोधा

tiger

राज्यात वाघांच्या मृत्यूंची संख्या का वाढलीय?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : मध्यभारतात देशातील ७० टक्के वाघ (Tiger)आहेत. मात्र, देशात वाघांच्या मृत्यूमध्ये (maharashtra tiger death) महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असलेल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. आता देखील गेल्या जानेवारी महिन्यापासून जवळपास २४ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, हे वाघांचे मृत्यू का वाढलेत? यावरही विचार करण्याची गरज आहे.

हेही वाचा: International Tiger Day 2021 : वाघ खरंच 'नरभक्षी' असतो का?

वाघ हा जंगलाचा राजा, जंगलाचा श्वास आहे. त्याला बघण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. तेव्हा वाघाचे दर्शन व्हावे हीच त्यांची इच्छा असते. त्याचे कारणही देशात वाढलेली व्याघ्र संख्या आहे. मध्यभारतात देशातील ७० टक्के वाघ आहेत. मात्र, याच परिसरात वाघांच्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. वाघांचे मृत्यू हे नक्कीच चिंताजनक बाब आहे.

वाघांच्या मृत्यूची कारणे -

  • देशात सर्वाधिक वाघांचे मृत्यू हे नैसर्गिक कारणामुळे होतात. देशातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प हे मध्य प्रदेशात असून, वाघांची संख्याही तिथेच सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे. वाघांच्या मृत्यूमागे शिकाऱ्यांकडून मारले जाणारे वाघ आणि मनुष्य-प्राणीसंघर्षांतून वाघांना मारण्याचे प्रकार ही दोन प्रमुख कारणे आहेत. याशिवाय अपघातांमुळे वाघांचे मृत्यू वाढले आहेत.

  • दोन वाघांमधील संघर्ष हे वाघाच्या मृत्यूचे महत्वाचे कारण आहे. देशभरातील विविध व्याघ्र प्रकल्पांत वनक्षेत्राच्या क्षमतेपेक्षा जास्त वाघ असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील अधिवासाची क्षमता ९० असताना तिथे १२५ पेक्षा जास्त वाघ राहतात. हीच परिस्थिती इतर व्याघ्र प्रकल्पांत दिसते. त्यामुळे वाघांमधील हद्दींचा वाद वाढत आहे. अनेकदा आपल्या हद्दीत आल्याच्या कारणावरून दोन वाघांमध्ये संघर्ष होते. त्यामधूनच वाघांचा मृत्यू होतो.

  • गेल्या चार वर्षांमध्ये वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यात राज्यात वाघ आणि बिबट्यांच्या सभोवताल शिकारीचे दृष्टचक्र लागले आहे. गेल्या दीड महिन्यात २९ आरोपींना ताब्यात घेतले असून वाघाच्या शिकाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात असल्याचे अधिकारी सांगतात.

loading image
go to top