इगतपुरी- तालुक्याला आणि कसारा घाट परिसराला निसर्गाचे भरभरून असे वरदान लाभले आहे. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे आणि अनेक पशूपक्षी, प्राणी यांचे आश्रयस्थान असलेल्या तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात ,घाटमाथा परिसरातील डोंगरदऱ्यांतून व कसारा घाटातील रेल्वेच्या लोहमार्ग लगत असणाऱ्या गवताला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जाळून खाक केले जात आहे.