CM एकनाथ शिंदे ठाणे सोडणार? भाजपच्या हायकमांडच्या भूमिकेकडे लक्ष

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो
devendra fadnavis, amit shah and cm eknath shinde
devendra fadnavis, amit shah and cm eknath shindesakal

शिवसेना फुटीनंतर आता आगामी निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. अशातच शिवसेनेचा मतदार संघ असलेले ठाणे ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे आता सध्याचे खासदार राजन विचारे हेच पुन्हा रिंगणात उतरतील, हे चित्र स्पष्ट झालं आहे. तर याच मतदारसंघात आपल्या ताब्यात यावी यासाठी भाजपनेही जोर लावला आहे. (Latest Marathi News)

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदार संघाबाबत कोणतीच भूमिका जाहीर केली नसल्यामुळे हायकमांडकडूनच या मतदार संघाबाबत शब्द टाकण्याची तयारीही भाजपकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत.(Marathi Tajya Batmya)

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. प्रकाश परांजपे यांच्यापासून राजन विचारेंपर्यंत हा मतदार संघ शिवसेनेकडे राहिला होता. याआधी या ठिकाणी भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी गाजवलेला हा गड भाजपने सोडला, पण गेल्यावर्षीच्या सत्तांतरानंतर शिवसेनेतील फुटीनंतर भाजपने पुन्हा या मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे.(Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीसाठी ही नवे चर्चेत

भाजपकडून राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, ठाण्यातील आमदार संजय केळकर आणि संजीव नाईक यांची नावे चर्चेत आली आहेत. नाईक ठाण्यात निवडणूक लढवून विजयी झाले होते. तर सहस्त्रबुद्धे स्पर्धेत असले, तरी त्यांची इतकी चर्चा नाही. ठाण्यात असून शिंदे यांच्या शिवसेनेला विरोध करणारे संजय केळकर यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली नाहीये. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांचे नाव चर्चेत आहे.(Marathi Tajya Batmya)

तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे, हे समोर आलेलं नाही. ठाणे मतदारसंघाच्या बदल्यात त्यांना कोणता दूसरा मतदारसंघ हवा आहे, हेही स्पष्ट समोर आलेलं नाही. भाजप ‘हायकमांड’ने आग्रह केला, तर शिंदे नाही म्हणणार नाहीत, असा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. तसे झाले तर लोकसभेत भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत होण्यची शक्यता आहे.(Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com