कोकणातही आता पाण्यावर उतरणार विमान : सुरेश प्रभू

अनंत पाताडे
मंगळवार, 5 मार्च 2019

देशात पहिल्यांदा पाण्यावर उतरणारी विमानसेवा ( सी-प्लेन) सुरु करण्यात आली. त्यानंतर आता ही विमानसेवा कोकणच्या प्रत्येक भागामध्ये लवकरच सुरू करण्यात येईल.

- सुरेश प्रभू, नागरी उड्डाणमंत्री

सिंधुदुर्ग : देशात पहिल्यांदा पाण्यावर उतरणारी विमानसेवा ( सी-प्लेन) सुरु करण्यात आली. त्यानंतर आता ही विमानसेवा कोकणच्या प्रत्येक भागामध्ये लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

चिपी विमानतळ येथे एका उद्घाटन सोहळ्यासाठी सुरेश प्रभू उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, कोकणातील बंदरे चांगल्याप्रकारे विकसित होऊ शकतात. याचाच फायदा ग्रामीण भागांतील लोकांना होऊ शकतो. पाण्यावर उतरणारी विमानसेवा कोकणच्या प्रत्येक भागांत सुरु करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: will now be flying to the water at Konkan says Suresh Prabhu