Vidhan Sabha 2019 : हवं तर मी ऑडिओ क्लिप ऐकवते : मेधा कुलकर्णी (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
Wednesday, 2 October 2019

पक्षाशी एकनिष्ठ राहणार

- अनेक पक्षाचे फोन

- दादा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल

पुणे : मला अनेक पक्षांचे फोन आले. हवं तर मी ऑडिओ क्लिप ऐकवते. पण मी कुठंही जाणार नाही. माझी संघटनेवर निष्ठा आहे, माझा प्राणही हेच सांगेल, अशा शब्दांत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी आपली भावना व्यक्त केली.

कोथरुड येथे भाजपच्या मेळाव्यात मेधा कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री आणि कोथरुड मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, संजय काकडे उपस्थित होते. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, राज्यात 288 मतदारसंघ आहेत. मात्र, या मतदारसंघात दादांना उमेदवारी मिळाल्याने ते भाग्य तुम्हाला लाभले आहे. कोथरुडचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच गेल्या 7 वर्षांत चंद्रकांत पाटील यांनी महसूलमंत्री म्हणून अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत.  

दरम्यान, मागील निवडणुकीत ज्याप्रकारे मताधिक्य मिळाले होते. त्याचप्रकारे मताधिक्य याही निवडणुकीत देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

मेधा कुलकर्णी गहिवरल्या

कोथरुडचे प्रतिनिधित्व करत असताना अनेक कामे मार्गी लावली. केलेल्या कामांचा दाखला देताना मेधा कुलकर्णी गहिवरल्या.

पक्षाशी एकनिष्ठ राहणार

पक्षाला मजबूत केलं. माणसं जोडली. कोणी कितीही वावड्या उठवल्या आणि काहीही झालं तरी मी पक्षाशी एकनिष्ठ असेन, असेही त्या म्हणाल्या. 

अनेक पक्षाचे फोन

मला अनेक पक्षाचे फोन आले. पण मी कुठंही जाणार नाही. माझी संघटनेवर निष्ठा आहे, माझा प्राणही हेच सांगेल. 'भाजप जय हो', थोडे दुःख होऊ शकते, आपण माणूस आहोत.

दादा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल

कोथरूडचे प्रतिनिधित्त्व करत असताना मी जिव्हाळा जपला. त्यामुळे आता त्या बळावर दादा तुम्हाला मोठे बहुमत मिळेल, असेही त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will remain loyal to the BJP says Medha Kulkarni Maharashtra Vidhan Sabha 2019