एसटी संप मिटणार? सायंकाळी सहा वाजता अनिल परब करणार मोठी घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Parab

एसटी संप मिटणार? सायंकाळी सहा वाजता अनिल परब करणार मोठी घोषणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: आज एसटी संपाबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी सहा वाजता परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेणार आहेत. एसटीचे कर्मचारी आणि सरकार यांच्यामध्ये चर्चेनंतर काही तोडगा निघण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत ते काय घोषणा करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा: साहित्य संमेलनातच वाङमयचौर्य? 'थिम साँग'मध्ये चोरीचा मामला

एसटीचे कर्मचारी महामंडळाच्या विलीकरणावर ठाम होते. मात्र, हा विषय सुप्रीम कोर्टात प्रस्तावित असल्याने त्यावर सध्या काहीच निर्णय घेता येणार नसल्याचं परब यांनी स्पष्ट केलं होतं. सुप्रीम कोर्टाची समिती जो निर्णय देईल, तो स्विकारला जाईल. मात्र, तोवर संप चालू ठेवला जाऊ शकत नाही. अंतरिम काही निर्णय घेतला जाऊ शकतो का, याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवरच एसटी संपासंदर्भात आज सायंकाळी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. काल देखील अनिल परब यांची सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर आणि एसटीच्या शिष्टमंडळाशी बैठक झाली होती. त्यात अनिल परब यांनी अंतरिम वाढीसंदर्भातील काही मध्यममार्गी प्रस्ताव ठेवले होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा बैठक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top