Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खरंच वीस दिवसांमध्ये NDA मध्ये येतील का? आमदाराचा नेमका दावा काय?

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये पंतप्रदान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी बाळासाहेबांचं प्रेम विसरु शकत नाही.. आम्ही कायम बाळासाहेबांच्या ऋणात राहू आणि कधीच त्यांच्याविरोधात बोलणार नाहीत. जर उद्धव ठाकरेंना काही त्रास असेल तर त्यांची मदत करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर जाईल.
PM Narendra Modi Uddhav Thackeray
PM Narendra Modi Uddhav ThackeraySakal

मुंबईः एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेनेची दोन शकलं पाडल्यानंतर राज्यामध्ये मोठा भूकंप झाला होता. तशीच परिस्थिती आणखी एकदा उद्भवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. भाजपच्या नेत्याने असा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

'सीएनएन-न्यूज 18'शी बोलताना आमदार रवी राणा यांनी दावा केला की, एनडीएच्या शपथविधी सोहळ्यानंतर वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींसोबत सरकारमध्ये सहभागी होतील. ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविषयी आक्रमक भाषा वापरली असली तरी हे खरं होणार आहे.

PM Narendra Modi Uddhav Thackeray
Accident News: लग्नाच्या वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी

''माझं म्हणणं खरं ठरणार आहे'' असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंसाठी कायम दरवाजे उघडे आहेत, कारण ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. मला माहितय ते भाजपसोबत माघारी येतील.''

पंतप्रधान मोदींकडून संकेत?

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये पंतप्रदान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी बाळासाहेबांचं प्रेम विसरु शकत नाही.. आम्ही कायम बाळासाहेबांच्या ऋणात राहू आणि कधीच त्यांच्याविरोधात बोलणार नाहीत. जर उद्धव ठाकरेंना काही त्रास असेल तर त्यांची मदत करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर जाईल.

PM Narendra Modi Uddhav Thackeray
Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढले देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना उत्तर देत, तुमच्याकडून भलेही दरवाजे उघडे असतील.. तुम्हाला हवं ते करा पण मी माघारी येणार नाही.. आणि पुन्हा एनडीएमध्ये येण्याची गरजही पडणार नाही. कारण तुम्ही पुन्हा केंद्रात असणार नाहीत.

या सगळ्या वेगवेगळ्या विधानांमुळे अंतर्गत राजकारणात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com